शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कोझीकोड विमान अपघात : ६६० कोटींची भरपाई, देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:11 IST

Kozhikode plane crash: सदर विमान अपघातात झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानासाठी विमा कंपन्यांनी ८.९ कोटी डॉलर भरपाई जाहीर केली आहे.  

नवी दिल्ली : केरळमधील कोझीकोड विमानतळावर ७ ऑगस्ट रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बोइंग ७३७ विमानाला झालेल्या अपघातानंतर देश-विदेशांतील विमा कंपन्या संबंधितांना ६६० कोटी रुपयांची (८.९ कोटी डॉलर) भरपाई देणार आहेत. भारतीय हवाई वाहतुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या रकमेची भरपाई मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. सदर विमान अपघातात झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानासाठी विमा कंपन्यांनी ८.९ कोटी डॉलर भरपाई जाहीर केली आहे.  या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसदारांना किंवा जखमी व्यक्तींना ३.८ कोटी डॉलर भरपाई देण्यात येईल, तर अपघातग्रस्त विमान व इतर गोष्टींसाठी  ५.१ कोटी डॉलरची भरपाई दिली जाईल.  न्यू इंडिया ॲॅश्युअरन्स (एनआयए) या विमा  कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, कोळीकोड येथील अपघातानंतर न्यू इंडिया ॲॅश्युअरन्सकडून एअर इंडियाला नुकसानभरपाईपोटी ३७३.८३ कोटी रुपये देण्यात येतील. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात विमा कंपन्यांनी इतकी मोठी रक्कम नुकसानभरपाईपोटी याआधी कधीही दिलेली नाही. दुबईहून आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान कोझीकोड विमानतळावर झालेल्या अपघातात दोन वैमानिकांसह २१ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. या अपघातप्रकरणी विदेशातील जीआयसी आरईसह काही विमा कंपन्यांनी ७० लाख डॉलरची भरपाई दिली आहे. 

काही महिन्यांनंतर मिळणार पैसे कोझीकोड विमान अपघातातील प्रत्येक जखमी व्यक्ती, तसेच मृतांच्या वारसदारांना भरपाई देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही महिने लागतील.या दुर्घटनेत विमानाचे जे प्रचंड नुकसान झाले त्याबद्दलची योग्य कागदपत्रे आम्हाला मिळताच त्यानंतर दोन दिवसांच्या आत ही भरपाई केली जाईल, असे विमा कंपन्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात