शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Koregaon Bhima: आरोपींना जामीन देऊ नका, गुन्हे गंभीर आहेत; राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 13:14 IST

भीमा कोरेगाव प्रकरणी नागपुरातील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली - भीमा-कोरेगाव प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आले असून अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी अर्धवट दोषारोपत्र दाखल झाले असेल तर मला जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचे एल्गार व कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी अ‍ॅड. सुरेद्र गडलिंग यांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र, सुरेंद्र गडलिंग आणि इतर आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे तांत्रिक बाबींचे कारण देतही त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती राज्य सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.  

भीमा कोरेगाव प्रकरणी नागपुरातील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. गडलिंग यांच्यासोबत सुधीर ढवळे व शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेत प्रक्षोभग भाषणे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पुणे पोलिसांनी यापूर्वी त्यांच्या घरावर छापे मारले आहेत. त्यात गडलिंग यांच्या घराचीही झडती घेण्यात येऊन काही दस्तावेज, पेनड्राईव्ह, सीडी, डिव्हीडी व हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. जरिपटका येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी जानेवारी 2019 पर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

न्यायालयाकडून अ‍ॅड. गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारState Governmentराज्य सरकार