शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आता तुम्ही खिशात घेऊन फिरू शकणार व्हेंटिलेटर, भारतीय वैज्ञानिकानं लावला जबरदस्त शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 15:14 IST

Pocket Ventilator : भारतातील वैज्ञानिकानं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर'. हा नवा शोध नागरिकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. पाहा काय आहे खासियत.

ठळक मुद्देभारतातील वैज्ञानिकानं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर'. हा नवा शोध नागरिकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या रुग्णसंख्या तुलनेनं कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता देशात जाणवली होती. परंतु कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं यावर तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत आणि सातत्यानं अशाप्रकारचे नवनव्या गोष्टींवर काम करत असतात. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयार केला आहे. यामुळे एखाद्या रुग्णाला त्वरित दिलासा मिळू शकतो. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. अशातच जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायकही ठरू शकतो."कोरोना संकटादरम्यान माझ्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल ८८ पर्यंत पोहोचली होती. तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी मला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी संकटातून बाहेर आलो. यानंतर माझ्या डोक्यात रुग्णांच्या मदतीसाठी काहीतरी करण्याची कल्पना आली. माझी तब्येत बरी झाल्यानंतर मी यावर काम करण्यास सुरूवात केली आणि २० दिवसांमध्ये ते तयारही झालं," असं डॉ. मुखर्जी म्हणाले. मास्क जोडलेलामिळालेल्या माहितीनुसार या डिव्हाईसमध्ये दोन युनिट आहेत. पॉवर आणि व्हेंटिलेटर हे मास्कशी जोडलेले आहेत. एक बटन दाबल्यानंतर व्हेंटिलेटर काम करण्यास सुरूवात करतो. तसंच याद्वारे शुद्ध ऑक्सिजन रुग्णापर्यंत पोहोचवला जातो. जर कोणत्याही रुग्णाला कोरोनाची लागण झाली असेल तर युव्ही फिल्टर विषाणूचा खात्मा करण्यास मदत करतो आणि शुद्ध हवा रुग्णापर्यंत पोहोचवतो, असं मुखर्जी म्हणाले. ब्लॅक फंगसचे रुग्ण जेव्हा वाढत आहेत, अशा परिस्थितीत हे रुग्णांसाठी मदतीचं ठरू शकतं असा दावाही त्यांनी केला आहे. काय आहे विशेष?या व्हेंटिलेटरची एक महत्त्वाची बाब म्हणजे यात एक कंट्रोल नॉब आहे जो हवेचा फ्लो कंट्रोल करतो. याचं वजन केवळ २५० ग्राम आहे. हा व्हेंटिलेटर ब‌ॅटरीच्या मदतीनंही चालतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा व्हेंटिलेटर ८ तास काम करतो. तसंच अँड्रॉईड फोनच्या चार्जरनंही हा व्हेंटिलेटर चार्ज करता येऊ शकतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतwest bengalपश्चिम बंगालOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल