शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 11:25 IST

Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांनी सीबीआयला आपल्या मुलीच्या कॉल रेकॉर्डचे "सुरक्षित" ठेवण्याची विनंती केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सीबीआयला सांगितलं की, "आपण आपल्या मुलीशी तिच्या मृत्यूच्या काही तास आधी फोनवर बोललो होतो."

सीबीआयला लिहिलेल्या पत्रात, वडिलांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, विशेषत: सेमिनार हॉलच्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज, जिथे ९ ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता, ते सुरक्षित ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच सीबीआयच्या सूत्राने सांगितलं की, वडिलांनी आम्हाला पत्र लिहून कॉल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची विनंती केली आहे.

अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील बलात्कार-हत्या प्रकरणातील त्यांच्या चौकशीच्या स्टेटस रिपोर्टसह हे पत्र १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलं होतं. आपल्या दोन पानी पत्रात डॉक्टरच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूच्या तपासाबाबत आपली असहायता आणि चिंता व्यक्त केली आहे.

ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांनी सीबीआय अधिकाऱ्यांना ड्युटी चार्ट जप्त करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून ८ ऑगस्टच्या रात्री आपल्या मुलीसोबत कोण ड्युटीवर होतं? हे कळू शकेल. या गुन्ह्यात रुग्णालयातील अनेक इंटर्न आणि डॉक्टरांचा सहभाग असू शकतो, असंही पालकांनी सीबीआयला सांगितलं.

९ ऑगस्ट रोजी, सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरचा मृतदेह सापडल्याच्या एका दिवसानंतर, कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाच्या संबंधात संजय रॉयला अटक केली. १३ ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्याच दिवसापासून सीबीआयने तपास सुरू केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर