शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 09:49 IST

गेल्या काही दिवसांपासून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून नकार दिला आहे. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कोलकाता : काही महिन्यांपूर्वीच आंध्र प्रदेश सरकारसह प. बंगालमध्ये परवानगीशिवाय सीबीआय अधिकाऱ्यांना छापेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. आज कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आणखी चिघळणार आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महापौर फिरहाद हकीम दाखल झाले असून चर्चा सुरु आहे. 

 गेल्या काही दिवसांपासून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून नकार दिला आहे. अमित शहा यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास मनाई केल्यानंतर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही परवानगी नाकारण्यात आली. शेवटी योगी यांनी फोनवरून भाषण द्यावे लागले. 

सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी नेले...सीबीआय ही केंद्र सरकारच्या अखत्यारितील तपास यंत्रणा आहे. दिल्लीत तपास करण्यासाठी किंवा छापे मारण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते. मात्र, अन्य राज्यांमध्ये तपास करण्यासाठी 'सर्वसाधारण सहमती' आवश्यक असते. राज्यांनी काही दशकांपूर्वी ही संमती दिली होती. मात्र, केंद्र सरकारकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या अधिकारातील राज्यांमध्ये सीबीआयला दिलेले पत्र मागे घेतले आहे. यामुळे प. बंगालमध्ये कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी छापा मारण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले आहे. 

 

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या कार्यालयाला वेढा घातला असून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

संबंधित बातमीसाठी चंद्राबाबू अन् ममतां दीदींचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्र, बंगालबंदी

पश्चिम बंगाल सरकारनं अमित शहांनंतर योगी आदित्यनाथांच्या रॅलीला परवानगी नाकारली

 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliceपोलिस