शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:26 IST

कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मागील वर्षी कोलकाता येथील आरजी कर मेडिक कॉलेजमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणाला वर्ष उलटले असून आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला. कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील एका तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याचे समोर आले. 

शहरातील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी आणि त्याच संस्थेतील दोन कर्मचारी आहेत. सध्या पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत.

"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री १० ते १०.५० वाजेपर्यंत आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या काळात पीडिता दयेची याचना करत राहिली. पण आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. 

२६ जून रोजी आरोपीला अटक

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केली.  २६ जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत आणि तिघांनाही न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबियांनाही बोलावून घटनेबद्दल विचारपूस केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

तिन्ही आरोपींवर सामूहिक अत्याचारचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने शहर पोलीस ठाणे गाठून महाविद्यालयातील दोन कर्मचारी आणि एका माजी विद्यार्थिनीविरुद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, तिची राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्यात आली.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीने तिला कॉलेजच्या खोलीत बोलावले. तिथे सामूहिक अत्याचार केला. आरोपींपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला आणि इतरांनी मुख्य आरोपीला मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस