TMC समर्थक असल्याची लाज वाटते, कोलकाता महापौरांच्या डॉक्टर मुलीची भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:47 IST2019-06-14T14:47:18+5:302019-06-14T14:47:30+5:30
पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

TMC समर्थक असल्याची लाज वाटते, कोलकाता महापौरांच्या डॉक्टर मुलीची भावना
कोलकाताः पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. तत्पूर्वी गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत डॉक्टरांनी कामावर परतावे, असे निर्देश ममता बॅनर्जी यांनी दिले होते. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यातच या डॉक्टरांना भारतीय चिकित्सा संघा(आयएमए)ची साथ मिळाली आहे.
आयएमएनंही आज अखिल भारतीय विरोध दिवस घोषित केला आहे. तसेच कोलकात्याचे महापौर फरहाद हकीम यांची मुलगी सबाह हकीम हिने ममता सरकारवरच हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जींकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा तिने निषेध नोंदवला आहे. डॉक्टरांनीसुद्धा शांततामयरीत्या विरोध प्रदर्शन केलं पाहिजे, असं आवाहन तिने केलं आहे.