Kolkata Airport: कोलकाता विमानतळावर अचानक उतरले 'कोरियन युद्ध विमाने', नेमकं काय झालं..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 20:42 IST2022-08-11T20:41:05+5:302022-08-11T20:42:06+5:30
Kolkata Airport: कोलकाताच्या आकाशात अचानक फायटर जेटचा आवाज ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Kolkata Airport: कोलकाता विमानतळावर अचानक उतरले 'कोरियन युद्ध विमाने', नेमकं काय झालं..?
कोलकाता: कोलकाताच्या आकाशात मंगळवारी अचानक फायटर जेटची गर्जना ऐकून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. कोलकात्याच्या न्यू टाऊन विमानतळाच्या आसपास युद्ध विमानांचा आवाज ऐकू आला. लोकांमध्ये उत्सुकता आणि भीतीची भावना होती. दक्षिण कोरियाचे हे फायटर जेट कोलकाच्या आकाशात काय करत आहेत, असा प्रश्न लोकांना पडला. अखेर विमानतळ प्रशासनाने या मागचे उत्तर दिले.
आरामासाठी कोलकात्यात लँडिंग
मंगळवारी दुपारपासून दक्षिण कोरियाच्या 9 ब्लॅक ईगल विमानांनी कोलकात्यात तळ ठोकला आहे. पण ही युद्ध विमाने युद्धासाठी नाही, तर आरामासाठी कोलकात्यात आले आहेत. हो, तुम्ही बरोबर वाचलं. हे फायटर जेट विमानतळाच्या ऍप्रन परिसरात पार्क करण्यात आले आहेत. ही सर्व कोरियन लढाऊ विमाने (T50B) असून, त्यावर मोठ्या अक्षरात ब्लॅक ईगल लिहिलेले आहे.
या विमानांना कोलकाता विमानतळ आश्रय देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने याबाबत एक ट्विटही केले आहे. त्यानुसार, ही कोरियन लढाऊ विमाने कोलकाता विमानतळावर इंधन भरण्यासाठी आणि वैमानिकांच्या आरामासाठी उतरली आहेत. कोरियाची ब्लाग ईगल विमाने प्रशिक्षणासाठी वापरली जातात. ही 9 कोरियन विमाने ब्रिटिश एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेली होती. मायदेशात परतताना त्यांनी इंधन भरण्यासाठी आणि विश्रांतीसाठी कोलकाता विमानतळाची निवड केली.