कोल्हापूर-पूर्णा विशेष उन्हाळी गाडी बुधवारपासून आठवड्यातून एकदा : 20 कोचेसची गाडी धावणार
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
सोलापूर : उन्हाळी सुटी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन कोल्हापूर-पूर्णा विशेष गाडी सुरू करीत आह़े विशेषत: 20 कोचेसची ही गाडी असून, बुधवारपासून आठवड्यातून एक दिवस ती सोलापूरमार्गे धावणार आह़े
कोल्हापूर-पूर्णा विशेष उन्हाळी गाडी बुधवारपासून आठवड्यातून एकदा : 20 कोचेसची गाडी धावणार
सोलापूर : उन्हाळी सुटी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन कोल्हापूर-पूर्णा विशेष गाडी सुरू करीत आह़े विशेषत: 20 कोचेसची ही गाडी असून, बुधवारपासून आठवड्यातून एक दिवस ती सोलापूरमार्गे धावणार आह़े गाडी क्रमांक 01419 कोल्हापूर-पूर्णा ही विशेष गाडी बुधवारी 18 मार्च रोजी कोल्हापूर स्थानकावरून दुपारी 3़45 वाजता सुटणार आह़े हातकणंगले, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगावमार्गे सायंकाळी 6़43 वाजता सांगोला स्थानकावर या गाडीचे आगमन होईल़ पाच मिनिटांचा थांबा घेऊन पंढरपूर स्थानकावरून सायंकाळी 7़15 वाजता मोडनिंबकडे मार्गस्थ होणार आह़े या स्थानकावर 1 मिनिटाचा थांबा घेऊन 7़47 वाजता कुडरूवाडीकडे धावणार आह़े कुडरूवाडी जंक्शनवर 10 मिनिटांचा थांबा घेऊन बार्शी स्थानकावर रात्री 9़2 वाजता आगमन होईल़ केवळ 2 मिनिटांचा थांबा घेऊन उस्मानाबाद स्थानकावर 9़43 वाजता आगमन होईल़ रात्री 11़05 मिनिटांनी लातूर स्थानकावर ती थांबेल़ पुढे लातूर रोड, परळी वैजनाथ करीत गुरुवारी सकाळी 7़20 वाजता परभणी स्थानकावर आगमन होईल़ अध्र्या तासाचा थांबा घेत सकाळी 8़20 वाजता पूर्णा स्थानकावर गाडी येऊन थांबेल़ तसेच हीच गाडी (01420) गुरुवार 19 मार्च रोजी सकाळी 11़10 वाजता पूर्णा स्थानकावरून परभणीकडे धावेल़ दुपारी 1़20 वाजता परळी वैजनाथ स्थानकावर आगमन होईल़ दुपारी 3़20 वाजता रेल्वेचे लातूर स्थानकावर आगमन होईल़ सायंकाळी 4़40 वाजता उस्मानाबाद स्थानकावर तर बार्शी स्थानकावर सायंकाळी 5़45 वाजता आगमन होईल़ सायंकाळी 6़10 वाजता कुडरूवाडी जंक्शनवर आगमन होईल आणि मोडनिंब स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा घेऊन सायंकाळी 6़45 वाजता सुटेल़ पंढरपूर स्थानकावर रात्री 7़20 वाजता येईल आणि रात्री 8़3 वाजता सांगोला स्थानकावर आगमन होईल़ पुढे ढालगाव, कवठेमहांकाळ करीत मिरज स्थानकावर रात्री 10़40 वाजता आगमन होईल़ हातकणंगले, रुकडीमार्गे कोल्हापूर स्थानकावर रात्री 12़50 वाजता येईल़ तीन महिन्यांसाठी विशेष गाडीरेल्वेने उन्हाळी सुटीचा विचार करता ही विशेष गाडी सुरु केली आह़े या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी हा 18 मार्च ते 24 जून 2015 राहणार आह़े या गाडीला दोन एसएलआर, सहा साधारण, नऊ स्लीपर, दोन वातानुकूलित थ्री टियर, एक वातानुकूलित टू टियर अशी एकूण 20 कोचेस राहणार आह़े सोलापूर विभागावरून धावणार्या गाड्यांमध्ये स्थायी स्वरूपात कोचची वाढ करण्यात येत आह़े क ोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस गाडीला 14 मार्चपासून एक स्लीपर कोच वाढवण्यात आली आह़े तसेच लोकमान्य टर्मिनस-मदुराई एक्स्प्रेस गाडीला 20 मार्चपासून एक वातानुकूलित थ्री टियर वाढवण्यात येत असल्याची माहिती मंडल वाणिज्य प्रबंधक मदनलाल मीणा यांनी दिली़