नागालँडमधील कोहीमा शहर धुम्रपान मुक्त घोषित

By Admin | Updated: April 29, 2016 14:00 IST2016-04-29T13:37:34+5:302016-04-29T14:00:30+5:30

नागालँडची राजधानी कोहीमा शहर धुम्रपान मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Kohima city in Nagaland declares smoke free | नागालँडमधील कोहीमा शहर धुम्रपान मुक्त घोषित

नागालँडमधील कोहीमा शहर धुम्रपान मुक्त घोषित

ऑनलाइन लोकमत 

कोहीमा, दि. २९ - नागालँडची राजधानी कोहीमा शहर धुम्रपान मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोहीमाचे जिल्हा उपायुक्त रोव्हीलटुयो मोर यांनी ही घोषणा केली. धुम्रपान मुक्त कोहीमाचे अभियान सुरु असताना त्यांनी हे जाहीर केले.या निर्णयामुळे कोहीमामध्ये यापुढे धुम्रपानावर बंदी असेल.   
 
कोहीमाला धुम्रपान मुक्त करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल. गुरुवारच्या या अभियानामध्ये २२ शाळातील मुले सहभागी झाली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध फलक घेतले होते त्यावर तंबाखू विरोधी संदेश लिहीले होते. 

Web Title: Kohima city in Nagaland declares smoke free