शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न सर्च करणाऱ्यांनो, पोलिसांच्या 'या' व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 10:56 IST

पाहा काय आहे या मेसेजमागील सत्य आणि काय म्हणाले पोलीस

ठळक मुद्देचाईल्ड पॉर्न सर्च करणाऱ्याबद्दल आहे हा मेसेजसोशल मीडियावर तेजीनं होतोय व्हायरल

सध्या एक मेसेज तेजीनं व्हायरल होत आहे. तसंच लोकांना मिळणाऱ्या या मेसेजमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचा इशारा दिला जात आहे. हा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यात पुढील वेळी पुन्हा अश्लील व्हिडीओ पाहिल्यास कायदेशीर कारवाई केली असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. हिंदी भाषेसोबतच पदेशी भाषांसोबत हा मेसेज व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशात ही घटना समोर आली आहे. दरम्यान, या व्हायरल मेसेजवर १०९० च्या एडीजी नीरा रावत यांनी तपासाचे आदेश दिले आहे. चाईल्ड पॉर्न संबंधी इंटरनेटवर माहिती सर्च करणाऱ्या लोकांना पॉप अप मेसेजद्वारे इशारा दिला जाणार आहे. परंतु काही लोकं जाणूनबुजून याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे, असं रावत म्हणाल्या. तसंच या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. १२ फेब्रुवारी रोजी १०९० कडून डिजिटल आऊटरिच प्रोग्राम 'हमारी सुरक्षा' या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. यामध्ये महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी एक रोडपॅम सादर करण्यात आला होता. तसंच १०९० डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहिती देऊन महिला आणि लहान मुलांना सुरक्षिततेचे धडे देण्याचं यामागचा उद्देश आहे.कार्यक्रमाच्या वेळी काय म्हणाल्या होत्या रावत?"इंटरनेटचा वाढता वापर पाहता १०९० नं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याच माध्यमाचा वापर केला. उत्तर प्रदेशात डिजिटल चक्रव्ह्यू (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आऊटरिच रोडमॅप तयार केला आहे," अशी माहिती १०९० मध्ये आयोजित एका कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी दिली होती. "सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात येईल. राज्यात जवळपास ११.६ कोटी इंटरनेट युझर्स आहेत. मुख्य रूपानं ते सर्वच १०९० च्या टार्गेटमध्ये आहेत. महिलांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम आयडीवर सुरक्षेशी निगडीत मेसेज आणि तरूणांना इशारा देणारा मेसेज पाठवण्यात येणार आहे," असंही त्या म्हणाल्या होत्या."या संपूर्ण योजनं नाव आमची सुरक्षा असं ठेवण्यात आलं आहे. या अंतर्गत सर्व इंटनेट युझर्सपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्यानं ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. १०९० ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल आणि निरनिराळ्या सोशल मीडिया युझर्सपर्यंत याबाबत माहिती पोहोचवली जाईल. सोशल मीडियावरू पाठवण्यात येणारे संदेशही तयार करण्यात आले आहेत," असंही त्यांनी सांगितलं होतं.

टॅग्स :InternetइंटरनेटUttar Pradeshउत्तर प्रदेशsmsएसएमएस