शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

केवळ 10 रुपयांत उघडा पोस्टात खाते अन् बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 4:47 PM

पोस्ट खात्यात 5 वर्षीय पोस्ट ऑफिस डिपॉजीट अकाऊंट (आरडी) काढून आपणास हे खाते उघडण्यात येईल.

नवी दिल्ली - कमी पैशात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल किंवा कमी पैशांच्या गुंतवणुकीत आपणास भरगोस परतावा कोठून मिळेल, याचा नेहमीच आपण शोध घेत असतो. त्यामुळेच, खासगी बँकांच्या योजना, फायनान्स कंपनीच्या योजना, एलआयसीच्या योजना आणि पोस्टाच्या योजनांकडे आपले सातत्याने लक्ष असते. आता, पोस्टाने अशीच एक योजना ग्राहकांसाठी आणली आहे. त्यानुसार, केवळ 10 रुपयांत पोस्टात खाते उघडले जाऊ शकते. 

पोस्ट खात्यात 5 वर्षीय पोस्ट ऑफिस डिपॉजीट अकाऊंट (आरडी) काढून आपणास हे खाते उघडण्यात येईल. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात हे खाते खोलता येईल. केवळ 10 रुपये भरुन हे खाते उघडण्यात येऊ शकते. या खात्यावर ग्राहकांना 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. जे व्याज बँकांमधून मिळणाऱ्या बचत खात्यापेक्षा अधिक आहे. सध्या, बँकांमधील बचत खात्यांवर 3.5 ते 6 टक्के (सर्वाधिक) व्याज मिळते. दरम्यान, या खात्यासाठी तुम्ही ज्वॉईंट पद्धतीनेही खाते खोलू शकता. 

पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल. 

* यासाठी आरडी करणे फायदेशीर यामध्ये तुम्ही तुमच्या बचतीनुसार दरमहिन्याला बचत करु शकता. एका विशिष्ठ लक्ष्यानुसार तुम्ही रक्कम बचत करु शकता. यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिळणारे व्याजदर निश्चित स्वरुपाचे आहे. ग्राहकांसाठी हा सर्वात मोठा फायदा आहे. नियमित व्याजसह फिक्स डिपॉजीटसाठीही याचा फायदा होतो. तुम्ही 10 वर्षांपर्यंत ही मुदतवाढ करु शकता. विशेष म्हणजे एका वर्षानंतर तुम्ही बचत खात्यातून 50 टक्के रक्कम काढूही शकता. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसbankबँक