शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Pushkar Singh Dhami Profile : जाणून घ्या, कोण आहेत उत्तराखंडचे पुढचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी; संघाची आहे पार्श्वभूमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 06:38 IST

स्वत: माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. धामी हे एक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत... (Pushkar Singh Dhami)

नवी दिल्ली - पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देहरादून येथे झालेल्या या बैठकीत धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते उत्तराखंडचे 11वे मुख्यमंत्री असतील. आज ते  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. (Know about the Pushkar Singh Dhami who elected as next cm of Uttarakhand by BJP legislature party)

कोण आहेत पुष्करसिंह धामी? युवा नेते पुष्करसिंह धामी हे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. धामी यांचा जन्म पिथौरागडमधील टुंडी या गावी झाला. ते उधमसिंह नगरमधील खतिमा विधानसभा मतदार संघातून यावेळी दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. धामी हे भगतसिंग कोश्यारी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते एक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत बऱ्याच महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ते दोन वेळा भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत.

स्वत: माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. उत्तराखंड भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर पुष्करसिंह म्हणाले, "माझ्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. आम्ही प्रत्येकाच्या सहकार्याने सार्वजनिक प्रश्नांवर कार्य करू.

धामी म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा या सर्वांचे आभार मानतो.” आगामी निवडणुकीत पक्षाच्या विजयासंदर्भात विचारले असता, हे एक आव्हान आहे आणि मी ते स्वीकारतो, अशेही धामी यांनी म्हटले आहे. 

तिरथसिंग रावत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला होता. यापूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. घटनात्मक पेच निर्माण झाल्याने आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणJ P Naddaजगत प्रकाश नड्डा