शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी शेतकऱ्यांचा किसान सन्मान निधी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:12 IST

राज्यांची कारवाई : चुकीची माहिती देऊन अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ

ठळक मुद्देही संख्या जवळपास २ कोटी असल्याचे समजते. यात अनेक पात्र शेतकऱ्यांची नावेही हटविली गेल्याच्या तक्रारी आता येत आहेत. विशेष म्हणजे, ४२ लाख अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी अलीकडेच संसदेत दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माेदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पीएम शेतकरी सन्मान योजने’तील सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांचा निधी राज्य सरकारांनी रोखून धरला असल्याची माहिती आहे. अपात्र शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी आल्या होत्या. प्राप्तिकर भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडून या योजनेचे पैसे परतही घेण्यात आले होते. यात तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. पूर्वानुभव लक्षात घेऊन राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या यादीची छाननी करून अनेकांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून हटविली आहेत. 

ही संख्या जवळपास २ कोटी असल्याचे समजते. यात अनेक पात्र शेतकऱ्यांची नावेही हटविली गेल्याच्या तक्रारी आता येत आहेत. विशेष म्हणजे, ४२ लाख अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी अलीकडेच संसदेत दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी सावध भूमिका घेतली असून, त्याचा फटका काही पात्र शेतकऱ्यांना बसत असल्याची तक्रार आहे.

nप्राप्त माहितीनुसार, या योजनेचा १२.१४ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत असून, योजनेचा ९वा हप्ता सरकारने नुकताच जारी केला आहे. ऑगस्ट-नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील २ हजार रुपये १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तथापि, दोन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत, अशी माहिती ‘पीएम किसान पोर्टल’वर देण्यात आली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना