दोन मतदार ओळखपत्रांमुळे किरण बेदी गोत्यात
By Admin | Updated: January 29, 2015 09:50 IST2015-01-29T09:46:26+5:302015-01-29T09:50:44+5:30
दिल्लीतील भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्र आढळल्याने वाद निर्माण झाला आहे.

दोन मतदार ओळखपत्रांमुळे किरण बेदी गोत्यात
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - दिल्लीतील भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्र आढळल्याने वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशी करण्याचे आदेश दिले असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते.
निवडणूक आोगाच्या माहितीनुसार किरण बेदींकडे दोन मतदार ओळखपत्र आहेत. यातील एका ओळखपत्रावर उदय पार्क येथील घराचा पत्ता आहे. तर दुस-या मतदार ओळखपत्रावर तालकटोरा येथील पत्ता टाकण्यात आला होता. बेदींनी दोन पैकी एक ओळखपत्र रद्द करण्यासाठी अर्ज करणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी तसे केले नसेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली. किरण बेदी यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.