अपहरणकर्ता समजून एकाला बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:22 IST2016-03-14T00:22:26+5:302016-03-14T00:22:26+5:30
जळगाव: खेळणार्या मुलांचे अपहरण करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरुन शिवाजी नगरातील हुडको भागात रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता अरुण उत्तम मिसाळ (वय ४५ रा.सुप्रीम कॉलनी) या मद्यपीस शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने बदडून काढले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मिसाळला ताब्यात घेतले.

अपहरणकर्ता समजून एकाला बदडले
ज गाव: खेळणार्या मुलांचे अपहरण करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरुन शिवाजी नगरातील हुडको भागात रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता अरुण उत्तम मिसाळ (वय ४५ रा.सुप्रीम कॉलनी) या मद्यपीस शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने बदडून काढले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मिसाळला ताब्यात घेतले.शिवाजी नगरात हुडको भागात चार मुले खेळत असताना मिसाळ हा तेथे उभा होता.यावेळी वसीम खान हुसेन खान मिस्तरी व चिकन विक्रेता शाकीर याकूब खाटीक या दोघांना त्याच्याविषयी शंका आल्याने त्याला आवाज दिला.तो त्यांच्याकडे न जाता दुसरीकडे जायला लागल्याने नागरीकांना त्याचा पाठलाग सुरु केला. लोक आपल्यामागे धावत येताहेत समजून तोही पळायला लागला. यावेळी महिला व काही पुरुषांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. यात त्याच्या छातीला, पोटाला व पाठीवर मुका मार लागला आहे. हा प्रकार शहर पोलिसांना समजल्यानंतर सहायक निरीक्षक दीपक गंधाले व विजय पाटील यांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता अपहरणसारखा कोणताच प्रकार नसल्याचे सिध्द झाले.गेल्या आठवड्यात शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्याने रविवारचा हा प्रकारही तसाच असावा अशी शंका आल्याने नागरीकांनी गैरसमजूत करुन त्यास बदडले. चौकशी अंती त्याच्या नातेवाईकांना बोलावून मिसाळला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.