शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

Kia च्या कारखान्यातून कोट्यवधी रुपयांचे १,००८ इंजिन चोरीला! माजी कर्मचाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:53 IST

Kia Engines Theft: आंध्र प्रदेशातील किआ इंडियाच्या कारखान्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Kia India Engines Theft: प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी Kia च्या भारतीय प्लांटमधून हजारो इंजिन चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या इंजिन चोरी प्रकरणात किआ इंडियाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांवर भंगार विक्रेत्यांशी संगनमत करुन कंपनीच्या कारखान्यातून १,००८ इंजिन चोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेचा कंपनीच्या कामकाजावर, भागधारकांच्या विश्वासावर आणि वर्कस्टेशनच्या सुरक्षिततेवर वाईट परिणाम झाला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पोलिस तपास कागदपत्रांवरुन असे दिसून आले की, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असलेल्या किआ इंडियाच्या प्लांटमधील दोन माजी कर्मचाऱ्यांवर भंगार विक्रेत्यांशी संगनमत करून गेल्या ३ वर्षात कारखान्यातून १,००८ इंजिन चोरी केल्याचा आरोप आहे. याची किंमत सुमारे २.३ मिलियन डॉलर्स (सुमारे १९.७४ कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते. 

प्रकरण कसे उघड झाले?मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चमध्ये किआ इंडियाने आंध्र प्रदेश पोलिसांकडे तक्रार केली की, कंपनीच्या अंतर्गत तपासात इंजिन गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात कंपनीला काही माजी कर्मचारी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांवर संशय होता. १६ एप्रिल रोजी पोलिसांनी जारी केलेल्या कागदपत्रांनुसार, प्राथमिक पोलिस तपासात आढळून आले की, किआ इंडिया कारखान्यातील दोन माजी कर्मचारी (एक टीम लीडर आणि इंजिन डिस्पॅच विभागातील विभाग प्रमुख) बनावट पावत्या आणि गेट पास वापरुन कारखान्यातून बेकायदेशीरपणे इंजिन वाहतूक करण्यात सहभागी होते.

या कर्मचाऱ्यांनी किमान दोन इतर व्यक्तींशी संगनमत करून हे कृत्य केले आहे. वाहतुकीची व्यवस्था करण्यास कोणी मदत केली आणि इतर दोन भंगार विक्रेत्यांनी देशाची राजधानी दिल्लीपर्यंत दूरवरच्या खरेदीदारांना ते विकण्यास मदत केली. या प्रकरणात, पोलिसांचे म्हणणे आहे की या संपूर्ण कारवाईत बनावट नोंदणी क्रमांक असलेले अनेक ट्रक देखील वापरले गेले आहेत.

कंपनीने काय म्हटले?इंजिन चोरीच्या या प्रकरणात किआ इंडियाने माध्यमांना सांगितले की, गेल्या वर्षी जेव्हा कंपनीने त्यांच्या इन्व्हेंटरी व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणा केली तेव्हा त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. सुरुवातीला किआ इंडियाने अंतर्गत चौकशी केली आणि चोरी उघडकीस आल्यानंतर लगेचच पोलिसांना कळवले. त्यानंतर चोरीत सहभागी असलेले लोक उघड होऊ शकले.

किआ इंडियाच्या व्यवस्थापनाने या वर्षी जानेवारीमध्ये इंजिन चोरीची पहिली तक्रार नोंदवली होती. सुमारे एक महिन्यानंतर, व्यवस्थापनाने प्लांट परिसरात सीसीटीव्ही फुटेजद्वारे अनधिकृत वाहनांची हालचाल पाहिली. मार्चमध्ये असे आढळून आले की हरवलेल्या इंजिनांची संख्या 940 पर्यंत वाढली आहे. या प्रकरणात, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी 9 मोबाईल फोन जप्त केले आहेत, ज्यात अनेक व्हॉट्सअॅप स्क्रीन शॉट्स, ट्रान्सपोर्ट इनव्हॉइस आणि ट्रकचे फोटो सापडले आहेत.

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सRobberyचोरीtheftचोरीAndhra Pradeshआंध्र प्रदेश