शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

खरीप अनुदानाचे वाटप पूर्ण

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

४ लाख ८५ हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमाऔरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या खरीप अनुदानाच्या संपूर्ण रकमेचे वाटप ...


४ लाख ८५ हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा
औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या खरीप अनुदानाच्या संपूर्ण रकमेचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर एकूण २३९ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यासह राज्यातील इतरही काही जिल्ह्यांत खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकर्‍यांना वैयक्तिक आर्थिक मदत देण्याचे डिसेंबर महिन्यात जाहीर केले. मराठवाड्यातील सर्व गावांची पैसेवारी पन्नासच्या आत आलेली आहे. त्यामुळे विभागातील सर्व शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांना मदत वाटपासाठी एकूण २८८ कोटी रुपये निधी लागणार आहे. राज्य सरकारने आतापर्यंत दोन टप्प्यात वरीलपैकी २३९ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला होता. या संपूर्ण निधीचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी सांगितले.
एक लाख शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा
जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार शेतकर्‍यांपैकी आतापर्यंत ४ लाख ८५ हजार शेतकर्‍यांनाच शासनाची वैयक्तिक मदत मिळाली आहे. अजूनही जवळपास एक लाख शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी आणखी ४९ कोटी रुपयांची मदत मिळणे बाकी आहे. ही मदत कधी मिळणार हे शासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
-----------------------
अनुदान वाटपाची तालुकानिहाय स्थिती
तालुकावितरित निधीशेतकरी
औरंगाबाद२४ कोटी ६ लाख४४४८५
पैठण३८ कोटी ११ लाख७४८२९
फुलंब्री१८ कोटी ३५ लाख४२७३८
वैजापूर४३ कोटी ९४ लाख८१७७४
गंगापूर३४ कोटी २५ लाख६९१०७
खुलताबाद१० कोटी ८८ लाख२२७८६
सिल्लोड२७ कोटी १७ लाख५९११३
कन्नड २९ कोटी ८५ लाख६४२८४
सोयगाव१३ कोटी २३ लाख२६७२१
-----------------------------------------------
एकूण २३९ कोटी ८८ लाख४८५८३७
-------------------------------------------------------