शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 17:42 IST

खर्गे यांच्या या वक्तव्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील भडकले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एका प्रचार सभेला संबोधित करताना थेट काँग्रेसाध्यक्षमल्लिकार्जुन खर्गे यांना निशाण्यावर घेत, काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे प्रभू श्रीराम आणि भगवान शिव यांच्यासंदर्भातील वक्तव्य अत्यंत 'खतरनाक' असल्याचे म्हणत, आता काँग्रेस हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तर खर्गे यांच्या या वक्तव्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील भडकले आहे. 

काय म्हणाले होते खर्गे? -पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी उल्लेख केलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचे ते वक्तव्य, छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा मतदार संघातील 30 एप्रिलच्या एका प्रचार सभेतील आहे. पक्षाचे उमेदवार शिवकुमार दहरिया यांच्यासाठी मते मागताना काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले होते, "त्यांचे नाव शिवकुमार आहे, ते रामाला बरोबरीत टक्कर देऊ शकतात. कारण ते शिव आहेत. माझे नावही मल्लिकार्जुन आहे, मी देखील शिव आहे. धार्मिक टीका (भाजपकडे इशारा करत) करून लोकांची दिशाभूल करू नका. लोक आता हुशार आणि सुशिक्षित झाले आहेत."

पंतप्रधान मोदींचा निशाणा- पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील भावनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, "काँग्रेसने हिंदूंच्या आस्थेत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यांनी भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्या संदर्भात अत्यंत खतरनाक वक्तव्य केले आहे. ते अत्यंत वाईट उद्देशाने केलेले विधान आहे. हिंदू समाजात फूट पाडण्याचा डाव आहे. ते राम भक्त आणि शिवभक्तांमध्ये भेद करत आहेत. त्यांच्यात भेद निर्माण करून भांडण लावण्याची त्यांची इच्छा आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली आपली महान परंपरा, राम असो, कृष्ण असो, शिव असो, जी मुघलांनाही तोडणं शक्य झालं नाही, मल्लिकार्जुन जी आणि काँग्रेस तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी किती खाली जाणार? काँग्रेसवाल्यांनो ऐका, जो प्रभू रामचंद्रांना संपवण्यासाठी निघाला होता, त्याची काय अवस्था झाली?"

योगी आदित्यनाथही भडकले -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावरून भडकले आहेत. यासंदर्भात गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, 'काँग्रेस लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अत्यंत वाइट पद्धतीने पराभूत होत आहे आणि पराभवाचे हे दुःख काँग्रेस बहुसंख्यक हिंदू समाजाच्या आस्थेशी खेळून आणि अपमान करून व्यक्त करत आहे.' 

एवढेच नाही तर, "काँग्रेसचा इतिहास अशा कृत्यांनी भरलेला आहे. काँग्रेसचे वास्तविक रूप समोर येत आहे. भारताच्या सनातन परंपरेचा अपमान करणे, तिची बदनामी करणे, भारताच्या श्रद्धेशी खेळणे, ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे आणि काँग्रेस अध्यक्षांना काँग्रेसकडून जे संस्कार मिळाले आहेत, तसेच ते बोलत आहेत." 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसBJPभाजपा