शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

खरगे निवडणार मुख्यमंत्री; नवनिर्वाचित आमदारांनी दिले निवडीचे सर्वाधिकार, खलबते सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 06:01 IST

कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी रविवारी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी अधिकृत केले, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पडते की, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात, याची उत्सुकता आहे. कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी रविवारी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी अधिकृत केले, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

एका खासगी हॉटेलात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षप्रमुखांना नेता निवडीचे अधिकार देणारा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी, केंद्रीय निरीक्षकांनी एआयसीसीचे सरचिटणीस (संघटन) के सी वेणुगोपाल यांच्यासमवेत सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांची बैठक घेतली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक कर्नाटकातील आमदारांचे मत पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले होते.

शिवकुमार-सिद्धरामय्या यांची नावे आघाडीवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी दोघांनीही आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक घेतली.

राममूर्ती १६ मतांनी विजयी बंगळुरूच्या जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवार सी. के. राममूर्ती यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी सौम्या रेड्डी यांचा १६ मतांच्या फरकाने पराभव केला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या नाट्यानंतर निकाल जाहीर झाला.

सुशीलकुमार शिंदेंसह ३ नेते निरीक्षक कर्नाटकात काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेसने रविवारी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे नेते जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. सायंकाळनंतर सीएलपीची बैठक सुरू होती.

अपक्ष आमदाराचा काँग्रेसला पाठिंबाहरपनहल्ली येथून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार लता मल्लिकार्जुन यांनी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे काँग्रेस समिती कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. लता मल्लिकार्जुन या ज्येष्ठ राजकारणी आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत एम. पी. प्रकाश यांच्या कन्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी सर्व काही व्यवस्थित झाले असून, लवकरच सरकार स्थापन होईल. राज्यातील जनतेची सेवा करणे हे काँग्रेसचे प्राधान्य आहे. पक्षाला कोणी मत दिले की नाही, याने पक्षाला काही फरक पडत नाही.     - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस  

भाजप करणार पराभवाचे विश्लेषणपराभवाची कारणे शोधण्यासाठी मतदारसंघनिहाय निकालांचे तपशीलवार विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हा  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचा काँग्रेसचा दावा त्यांनी फेटाळून लावला.  

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे