शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे म्हणणाऱ्या मोदींवर खर्गेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजपाला मिळणार केवळ एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 11:17 IST

Mallikarjun Kharge Criticize Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेबाहेर जाणार असून, भाजपाला १०० जागासुद्धा मिळणार नाहीत, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की, बंगालमधून चॅलेंज आलंय की, यावेळी काँग्रेसला ४० जागादेखील मिळणार नाहीत. मी प्रार्थना करतो की, काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला टोला लगावताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अब की बार भाजपा सत्तासे पार, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तसेच भाजपा १०० जागासुद्धा निवडून येणार नाहीत. मोदींची गॅरंटी ही देशातील शेतकरी, दलित आणि मागासवर्गियांसाठी नाही आहे. तर ती मोदींच्या मित्रांसाठी आहे. ते केवळ कांघ्रेसला शिविगाळ करू शकतात. यावेळी उद्योगपतींच्या कर्जमाफीवरून खर्गे यांनी मोदींवर टीका केली. मोदींच्या मित्रांचं १३ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांना १२-१३ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या कराव्या लागतात. मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळामध्ये धानाचा किमान हमिभाव १३५ टक्क्यांनी वाढलं होतं. तर भाजपा सरकारच्या कार्यकाळात ही किंमत केवळ ५० टक्क्यांनी वाढली आहे. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायाबाबत बोलतो. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास किमान हमिभाव कायदा लागू केला जाईल, असं आश्वासन आम्ही देत आहोत, असेही खर्गे यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा