खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी बालिका लकडे

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:41+5:302015-08-26T23:32:41+5:30

सोमेश्वरनगर : खंडोबाचीवाडी येथील ग्रामपंचायातीच्या सरपंचपदी बालिका दादा लकडे यांची, तर भगवान गेनबा गोफणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Khandobachiwadi's Sarpanch girl girl | खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी बालिका लकडे

खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी बालिका लकडे

मेश्वरनगर : खंडोबाचीवाडी येथील ग्रामपंचायातीच्या सरपंचपदी बालिका दादा लकडे यांची, तर भगवान गेनबा गोफणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल २० वर्षांनंतर सत्तांतर झाले. पणन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्याम काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, प्रमोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखालील सोमेश्वर जनशक्ती पॅनलने प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर व वसंतराव मदने यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनलचा धुव्वा उडवून खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीत २० वर्षांनंतर सत्तांतर घडविले. सरपंच व उपसरपंच पदांसाठी दोनच अर्ज आल्याने लकडे व गोफणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी श्याम काकडे, पुणे जिल्हा कृषी सेवा संघाचे उपाध्यक्ष गौतम काकडे, धनंजय गडदरे, सदस्य बाळासाहेब महानवर, राणी लकडे, रतनबाई गडदरे, सतीश वळकुंदे व मंदाकिनी लकडे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक नवले व ग्रामसेवक एम. एस. नगरे यांनी काम पाहिले.
फोटो— बालिका लकडे व भगवान गोफणे
२६०८२०१५-बारामती-३४
०००

Web Title: Khandobachiwadi's Sarpanch girl girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.