खाँ साहेबांची सरोद हरवली
By Admin | Updated: July 1, 2014 12:44 IST2014-07-01T02:42:01+5:302014-07-01T12:44:51+5:30
उस्ताद अमजद अली खाँ यांना अतूट साथ देणारी त्यांची 45 वर्षाची सखी ब्रिटिश एअरवेजच्या हलगर्जीने लंडनच्या विमानतळावर हरवली

खाँ साहेबांची सरोद हरवली
>नवी दिल्ली : नवरसांतील अनमोल सुरिल्या आविष्कारात उस्ताद अमजद अली खाँ यांना अतूट साथ देणारी त्यांची 45 वर्षाची सखी ब्रिटिश एअरवेजच्या हलगर्जीने लंडनच्या विमानतळावर हरवली आणि तिच्या शोधातील बेपर्वाईमुळे खाँ साहेबांना रौद्र रसाचा मार्ग स्वीकारावा लागला. खाँ साहेबांची हरवलेली सरोद हा अल्पावधीत आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला.
खाँ साहेबांच्या ज्या सरोदने गेली 45 वर्षे जगभरातील रसिकांचे कान तृप्त केले, ती ब्रिटिश एअरवेजकडून गहाळ झाली आहे. खाँ साहेब शनिवारी रात्री लंडनहून नवी दिल्लीला परतत असताना हा प्रकार घडला. हिथ्रो विमानतळाच्या टर्मिनल क्रमांक पाचवरील बॅगेज सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या असून त्या दूर करण्यात येत असल्याचा दावा ब्रिटिश एअरवेजने केला आहे. खाँ साहेबांनी नंतर त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 1997 मध्ये माङया सरोदची हानी केल्यानंतर ब्रिटिश एअरवेजने आता ती गहाळच केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)