नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही घुसखोरी केली असल्याचा दावा काँग्रेसचे लुधियानामधील खासदार रवनीत बिट्टू यांनी केला आहे. ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेत, असा दावा बिट्टू यांनी केला आहे.रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शिवीगाळ केली जात आहे. हे कसलं पंजाब आहे. पंजाबमधील लोक असे करू शकत नाहीत. पंजाबमधील शेतकरी असं करू शकत नाही. ठोक देंगेसारखी भाषा पंजाबची नाही आहे. अशी भाषा बोलणारे असामाजिक आहेत. पंतप्रधानांना मारू किंवा अन्य कुणाला मारू अशी भाषा शेतकरी करू शकत नाहीत. मी या आंदोलनामध्ये हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना फिरताना पाहिले आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.
शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 21:17 IST
Farmer Protest : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.
शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही केली घुसखोरी ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेतहे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात