शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

खलिस्तान प्रश्नावरून नरेंद्र मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:55 IST

खलिस्तानबाबत कणव दाखवणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहेत.

नवी दिल्ली - खलिस्तानबाबत कणव दाखवणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहेत.मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारताची एकता आणि अखंडतेला आव्हान देणे खपवून घेतले जाणार नाही, असे खडसावून सांगितले. फाळणीची बिजे पेरणाऱ्यांना इथे कोणतीही जागा नसल्याचे मोदी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी मोदी म्हणाले,"कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत आमचे अनेक मुद्यांवर एकमत झाले आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्याची गरज आहे.  दहशतवाद आणि कट्टरतावादाचा भारत आणि कॅनडासारख्या लोकशाहीवादी देशांसाठी धोका आहे. त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद आणि कट्टरतावाद हा खपवून घेतला जाऊ शकत नाही." " ट्रूडो यांच्या भारत दौऱ्याची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. त्यामुळे तुम्ही भारत दौऱ्यावर आला आहात याचा आनंद आहे. कॅनडामध्ये एक लाख 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आता दोन्ही देशांमधील नागरिकांना सुलभपणे ये-जा करता यावी यासाठी एमओयू ऑफ हायर एज्युकेशनवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत." असे मोदी म्हणाले.   कॅनडा हा युरेनियमचा मोठा पुरवठादार असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रामध्येही सहकार्य वाढवण्याबाबत सहमती झाल्याची माहिती दिली. कॅनडामध्ये भारतीय समुदायाच्या नागरिकांनी मिळवलेल्या यशाचाही मोदींनी आवर्जुन उल्लेख केला.  तसेच कॅनडासोबतची रणनीतिक भागीदारी पुढे नेण्याला भारत अधिक महत्त्व देत आहे, असेही त्यांनी सांगितले. कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतात करण्यात आलेल्या जोरदार स्वागतासाठी सर्वांचे आभार मानले.  अनेक घटक भारत आणि कॅनडामधील मैत्री वाढवण्यास मदतगार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही देशांमध्ये एकूण सहा करारांवर सह्या झाल्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतNew Delhiनवी दिल्ली