शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची केली सुटका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 15:39 IST

Keshav Prasad Maurya And BJP : योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्येराजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी पुन्हा एकदा एक विधान केलं आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे. योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत असं म्हटलं आहे. तसेच भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे. 

प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला केशव प्रसाद मौर्य यांनी संबोधित केले. "2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीछाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्‍यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमके द्यायचे. मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे."

"2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल"

"व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने 2014 ते 2019 पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत" असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या निवडणुकीसाठी सपा, बसपा आणि भाजपा जोरदार प्रयत्न करत आहेत. 

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपा पूर्ण आत्मविश्वासात आहे. यावेळी निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकून 2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल असा भाजपाचा दावा आहे. भाजपाने प्रयागराजमध्ये मंडलस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर येथील व्यापारी सहभागी झाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण