शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

जिथे दलित महिला आमदारानं दिले धरणे, 'त्या' जागी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं 'शुद्धीकरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 9:51 AM

युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक 'शुद्धीकरण' कार्यक्रम राबवल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्लीः केरळमधल्या भाकपाच्या एका दलित महिला आमदारानं धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन केलं होतं. त्याच ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक 'शुद्धीकरण' कार्यक्रम राबवल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. त्या दलित महिला आमदारानं काँग्रेस जातीवादाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. राज्यातील मंत्र्यांनीही युवा काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे कृत्य शोभनीय नसल्याचं म्हटलं आहे.त्रिशूरच्या जवळ चेरप्पूमध्ये नत्तिकातल्या आमदार गीता गोपी परिसरातल्या रस्त्याची दुर्दशा झाल्याच्याविरोधात अभियंता कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. त्यांच्याविरोधात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मार्च काढला. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. जिथे गीता धरणे आंदोलनाला बसल्या होत्या, तिथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक शुद्धीकरण करत गायीचं शेणमिश्रित पाणी त्या जागेवर शिंपडलं.त्या महिला आमदारानं काँग्रेसवर जातीवादाचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांत यासंदर्भात तक्रारही दिली आहे. केरळचे सांस्कृतिक मंत्री ए. के. बलान यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अशा घटना या जास्त करून उत्तर भारतात घडतात, हे स्वीकारार्ह नसल्याचं ते म्हणाले आहेत.