शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

चिंताजनक! केरळमध्ये कोरोना संकट गहिरे; दररोज ५ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद

By देवेश फडके | Published: January 28, 2021 12:32 PM

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये दररोज सुमारे ६ हजारांच्या घरात नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेत भर टाकणारा आहे.

ठळक मुद्देकेरळमध्ये कोरोनाचा कहर कायमकोरोना पॉझिटिव्ह रेट हा ११ टक्केगेल्या २४ तासांत ५ हजार ६५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत आहे. मात्र, केरळमध्ये कोरोनाचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेत भर टाकणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये दररोज सुमारे ६ हजारांच्या घरात नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधावारी संपूर्ण देशभरात ११ हजार ६६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी तब्बल ५ हजार ६५९ रुग्ण केवळ केरळमध्ये नोंदवले गेले. केरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रेट हा ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. केरळमध्ये एकूण कोरोना बाधितांचा आकडा ०९ लाख ०५ हजार ५९१ झाला आहे. तर ०५ हजार ०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ०८ लाख २९ हजार ४५२ वर पोहोचला आहे. 

गेल्या २४ तासांत १४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ६६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, १२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ०१ लाख ५३ हजार ८४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ०१ कोटी ०७ लाख ०१ हजार १९३ वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासांत १४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ०१ कोटी ०३ लाख ७३ हजार ६०६ वर पोहोचला आहे. 

१४७ जिल्ह्यांत सात दिवसांत कोरोना रुग्ण नाही

देशभरातील १४७ जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तर, १८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवासात, सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ आणि २१ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत कोरोनाचा एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

कोरोनाचे ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमध्ये

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची भारतात लागण झालेल्यांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. तर, कोरोनाचे ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमधील आहेत. देशात ०१ लाख ७३ हजार ७४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण २३ लाख ५५ हजार ९७९ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसKeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्रCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या