Kerala Floods : ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 09:52 AM2018-08-21T09:52:00+5:302018-08-21T09:54:15+5:30

केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात 20 दिवस पडलेल्या पावसाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Kerala got highest Aug rains in 87 years, in 20 days | Kerala Floods : ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांक

Kerala Floods : ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांक

Next

तिरुवनंतपुरम : महापुराने अक्षरशः वेढलेल्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात 20 दिवस पडलेल्या पावसाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या 87 वर्षांनंतर यंदा ऑगस्ट महिन्यात असा विक्रमी पाऊस पहिल्यांदाच पडला आहे. 
1 ते 20 ऑगस्टदरम्यान यंदा केरळमध्ये 771 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 87 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका पाऊस पडला आहे. हवामान विभागाचे अधिकारी पुलक गुहाठाकुरता यांनी सांगितले की, 1931 साली राज्यात ऑगस्ट महिन्यात 1132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हा सर्वाधिक जास्त पावसाचा महिना होता.  
या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाची नोंद अडीच पट जास्त आहे. इडुक्की जिल्ह्यात या महिन्यात पावसाचा 111 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त पाऊस पडला. ऑगस्टपर्यंत याठिकाणी 14419 मिलीमीटर पाऊस पडला आहे. याआधी 1907 मध्ये इडुक्कीमध्ये 1387 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. 

केरळमधील जलप्रलय गंभीर आपत्ती घोषित
 केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या महापुरामध्ये आजपर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होणार आहे. 

युएईच्या उद्योजकांकडून 12.5 कोटींची मदत
केरळच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या तीन भारतीय उद्योजकांनी 12.5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर युएईने 34 कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Kerala got highest Aug rains in 87 years, in 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.