Kerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 08:27 IST2018-08-19T08:26:42+5:302018-08-19T08:27:46+5:30
Kerala Floods: अतिवृष्टी व त्यामुळे आलेले पूर यांत लाखो लोक बेघर झाले असून, केरळमध्ये गेल्या 100 वर्षांतील हा सर्वात भीषण पूर असल्याची चर्चा आहे.

Kerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो
तिरुअनंतरपूरम : केरळमध्ये गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. या मुसळधार पावसानं केरळमध्ये हाहाकार माजवलाय. अतिवृष्टी व त्यामुळे आलेले पूर यांत लाखो लोक बेघर झाले असून, केरळमध्ये गेल्या 100 वर्षांतील हा सर्वात भीषण पूर असल्याची चर्चा आहे. पावसामुळे सर्व धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे रस्ते, घरे, दुकाने सारेच पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा तडाखा व जोरदार वारे यांमुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कच्च्याच नव्हे, तर पक्क्या घरांचेही प्रचंड नुकसान झाले असून, अशी एक लाखांहून अधिक घरे राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. आताची स्थिती पाहता, राज्य पूर्वपदावर येण्यास अनेक वर्षे लागणार आहेत. आणखी दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. केरळमधल्या 11 जिल्ह्यांमध्ये दोन हजार शिबिरे सुरू असून, त्यात 3 लाखांहून अधिक लोक राहत आहेत. या भीषण पुराची छायाचित्र पाहा..