मरावे परी कीर्तिरूपे उरावे! ब्रेन डेड विद्यार्थ्याने 7 लोकांना दिलं जीवदान; आरोग्यमंत्री अंत्यसंस्कारास हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 03:10 PM2021-09-29T15:10:14+5:302021-09-29T15:16:33+5:30

Brain dead student organ donated by family saves seven : केरळमधील एका कुटुंबाने आपल्या मुलाचं ब्रेन डेड झाल्यानंतर अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि यामुळे सात लोकांचा जीव वाचला आहे.

kerala brain dead student organ donated by family saves seven others green corridor transplanted | मरावे परी कीर्तिरूपे उरावे! ब्रेन डेड विद्यार्थ्याने 7 लोकांना दिलं जीवदान; आरोग्यमंत्री अंत्यसंस्कारास हजर

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! ब्रेन डेड विद्यार्थ्याने 7 लोकांना दिलं जीवदान; आरोग्यमंत्री अंत्यसंस्कारास हजर

Next

नवी दिल्ली - मरावे परी कीर्तिरूपे उरावे अशीच एक घटना समोर आली आहे. ब्रेन डेड विद्यार्थ्याच्या अवयदानामुळे तब्बल सात लोकांना जीवदान मिळालं आहे. केरळमधील एका कुटुंबाने आपल्या मुलाचं ब्रेन डेड झाल्यानंतर अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि यामुळे सात लोकांचा जीव वाचला आहे. या सातही जणांच्या आयुष्यात, कुटुंबात आनंद आला आहे. अवयव दान हेच सर्वात श्रेष्ठ दान असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नविस मॅथ्यू असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मास्टर डिग्री करत होता. 

फ्रान्समधून शिक्षण घेणारा नविस कोरोनामुळे केरळमधील आपल्या घरातूनच ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करत होता. 18 सप्टेंबरला नविस आपल्या नेहमीच्या वेळी उठला नाही म्हणून त्याची छोटी बहीण विस्मया त्याला जागं करण्यासाठी गेली. मात्र नविस झोपेतून उठतच नव्हता. यावेळी त्याचा श्वास सुरू होता. कुटुंबाने तातडीने त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल नेलं. डॉक्टरांनी नविसच्या शरीरातील सारखेचं प्रमाण खूप कमी झाल्याचं कुटुंबाला सांगितलं. 

नविसच्या प्रकृतीत सुधारण होत नसल्याने 20 सप्टेंबरला त्याला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र  चार दिवसांनी नविसला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. यानंतर त्याचे वडील साजन मॅथ्यू आणि कुटुंबाने अवयवदान करण्याची तयारी दर्शवली. नविसचं ह्रदय, हात, डोळे, कि़डनी आणि फुफ्फुस गरजू रुग्णांना देण्यात आलं आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी नविसच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. तसेच अनेक लोकांचा जीव वाचवल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आभार मानले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: kerala brain dead student organ donated by family saves seven others green corridor transplanted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.