शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी-शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही; उगाच त्यांचा वेळ वाया घालवू नका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 18:24 IST

काँग्रेस नेते आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांचा भाजपवर हल्लाबोल

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. राज्यात सत्ताधारी डावी आघाडी विरुद्ध डावी आघाडी असा थेट मुकाबला होत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) विरुद्ध काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी (युडीएफ) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना आलटून पालटून सत्ता मिळते. केरळचा राजकीय इतिहास तसा राहिलेला आहे. मात्र यंदा सत्तापरिवर्तन होणार नाही, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. केरळमध्ये सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी लोकशाही आघाडी सत्तेत आहे. मात्र यंदा परिवर्तन होणारचा असा ठाम विश्वास काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. एक्झिट पोलचे आकडे आम्हाला मान्य नाहीत. आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असं चेन्निथला म्हणाले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावरही हल्लाबोल केला. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येवो किंवा गृहमंत्री अमित शहा भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर केरळमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून चेन्निथला यांनी जोरदार टोलेबाजी केली. मोदी येवोत वा शहा, भाजपला एकही जागा मिळणार नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी मोदी, शहांचा वेळ वाया घालवू नये. कारण इथे भाजपचं काही होऊ शकत नाही. इथली जनता परिस्थिती उत्तम जाणते. भाजपला राज्यात कोणतंही स्थान नाही, हे मतदारांना माहीत आहे. आमची थेट लढत एलडीएफसोबत आहे, असं चेन्निथला यांनी सांगितलं.नुकत्याच समोर आलेल्या काही एक्झिट पोल्सनुसार केरळमध्ये एलडीएफचीच सत्ता कायम राहू शकते. याबद्दल विचारलं असता, हा एक्झिट पोल नसून केवळ सर्वेक्षण आहे. आम्हाला त्याची चिंता नाही. आम्ही सत्ता स्थापन करू आणि राज्यात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचं सरकार भ्रष्टाचारात बुडालेलं असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांच्या मनात सरकारबद्दल नाराजी आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन नक्की होईल आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होईल, असं चेन्निथला म्हणाले.

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेस