वाराणसीत केजरीवालांचा रोड शो, मोदींवर साधला निशाणा
By Admin | Updated: May 9, 2014 17:28 IST2014-05-09T17:27:53+5:302014-05-09T17:28:15+5:30
वाराणसीतील रोड शो दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधत या निवडणुकीत आपण मोठ्या मतांच्या फरकाने जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

वाराणसीत केजरीवालांचा रोड शो, मोदींवर साधला निशाणा
>ऑनलाइन टीम
वाराणसी, दि. ९ - वाराणसीतील रोड शो दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधत या निवडणुकीत आपण मोठ्या मतांच्या फरकाने जिंकू असा विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवसच उरलेले असून वाराणसीत १२ मे रोजी होणा-या मतदानासाठी दिग्गजांनी कसून प्रचार सुरू केला आहे. गुरूवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रोड शो नंतर शुक्रवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख व वाराणसीतून निवडणुक लढणारे अरविंद केजरीवाल यांनी शक्तीप्रदर्शन करत रोड शो केला. त्यावेळी ते बोलत होते.
' हेलिकॉप्टरने केवळ दोन तासांसाठी वाराणसीत आलेले लोकांची सेवा कशी करणार?' असा प्रश्न विचारत त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. वारणसीतील लोकांना सत्य काय आहे हे माहीत असल्याचे सागंत मोदींना येथे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल असा दावाही त्यांनी केला.