केजरीवालांना घरचा अहेर
By Admin | Updated: August 14, 2014 02:10 IST2014-08-14T02:10:45+5:302014-08-14T02:10:45+5:30
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संस्थापक सदस्य शांतिभूषण यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या संघटन कौशल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले

केजरीवालांना घरचा अहेर
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संस्थापक सदस्य शांतिभूषण यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या संघटन कौशल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, पक्षात अंतर्गत लोकशाही नसल्याचे म्हटले आहे.
माझ्या मते केजरीवाल हे उत्कृष्ट नेते आहेत. परंतु त्यांच्याकडे संघटन कौशल्याचा अभाव आहे, असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना शांतिभूषण म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा देशभर विस्तार होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले.
केजरीवाल यांनी संघटनांची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवावी. त्यांनी पक्षातील इतर नेत्यांबरोबरही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करायला हवी, असा सल्लाही शांतिभूषण यांनी केजरीवाल यांना दिला.
लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर अनेकांनी पक्ष सोडला आहे. योगेंद्र यादवसह अनेक नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका देखील केली.(वृत्तसंस्था)