शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:21 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान भाजप नव्हे, तर काँग्रेसचेच होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान भाजप नव्हे, तर काँग्रेसचेच होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) हा I.N.D.I.A.चा भाग आहे. दिल्लीमध्येकाँग्रेस आणि आप सोबत निवडणूक लढवत आहेत. मात्र, पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष एक-मेकांसमोर उभे ठाकले आहेत.

प्रशांत किशोर आरटीव्हीला दिलेल्या एका मुलाखती म्हणाले, "आप संपूर्ण भारतभरात 13 जागा पंजाबमध्ये 7 जागा दिल्लीत तर एक जागा गुजरातमध्ये लढवत आहे. यामुळे केजरीवाल बाहेर आल्याने जो काही बदल होणार तो केवळ याच जागांवर होईल. यांपैकी पंजाबच्या 13 जागांवर आप आणि काँग्रेस यांच्यात थेट फाइट आहे. येथे जर आपला फायदा झाला, तर नुकसान काँग्रेसचेच होईल.''

पीके म्हणाले, पंजाबमध्ये भाजपही निवडणूक लढवत आहे. मात्र आपची खरी फाईट कांग्रेससोबत आहे. 2019 मध्ये, भाजपने पंजाबमध्ये गुरदासपूर आणि होशियारपूरमध्ये विजय मिळवला होता. यावेळी भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व 13 जागांवर उमेदवार उतरवले आहेत.

आपच्या कार्यकरत्यांचे मनोबल वाढेल -प्रशांत किशोर म्हणाले, केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मनोबल वाढेल. मात्र ते पंजाब आणि दिल्ली व्यतिरिक्त बाहेरील मतदारांच्या भावनांना प्रभावित करू शकणार नाहीत. महत्वाचे म्हणजे, दिल्लीमध्ये 7 लोकसभा जागांसाठी 25 मे रोजी, तर पंजाबमधील 13 जागांवर 1 जूनरोजी मतदान होईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prashant Kishoreप्रशांत किशोरArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेसPunjabपंजाबdelhiदिल्ली