केजरीवाल यांना मिळेना दिल्लीत घर

By Admin | Updated: June 18, 2014 15:33 IST2014-06-18T15:33:20+5:302014-06-18T15:33:20+5:30

आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या वाढलेल्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.

Kejriwal meets home in Delhi | केजरीवाल यांना मिळेना दिल्लीत घर

केजरीवाल यांना मिळेना दिल्लीत घर

>ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. १८ - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या वाढलेल्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले केजरीवाल यांना सध्या दिल्लीत कुणी भाडयाने घर द्यायला तयार नसल्याने पहिल्यांदाच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यावर ही वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून केजरीवाल यांचा करीष्मा दिल्लीसह देशात कमी झाल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना पंजाब वगळता इतर राज्यात यश मिळाले नाही. त्यानंतर भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेला आरोप केजरीवाल यांच्या चांगलाच अंगलट आला. सरकारी निवासस्थानात गेलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्या मुलीची परीक्षा असल्याने आपल्याला काही दिवस या बंगल्यात वास्तव्य करू द्यावे अशी न्यायालयाला विनंती केली होती. आता मात्र परीक्षा संपल्याने केजरीवाल यांना सरकारी निवासस्थान खाली करायचे आहे. परंतू दिल्लीत त्यांना कोणी भाड्याने घर द्यायला तयार नाहीत. केजरीवाल हे राजकारणी असल्याने त्यांना घर दिल्यास त्या ठिकाणी अनेक लोकांची ये-जा होईल. त्यामुळे या ठिकाणी राहणा-या लोकांना त्यांचा नाहक त्रास होईल असे सांगत अनेकांनी केजरीवाल यांना आपले घर देण्यास नकार दर्शविला आहे. 

Web Title: Kejriwal meets home in Delhi