शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रोड शोमुळे वेळेवर पोहोचू शकले नाहीत केजरीवाल  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 5:40 AM

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उशीर झाल्याने नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उशीर झाल्याने नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.मुख्यमंत्री यांना ‘आप’ने नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. यासाठी ते सकाळी घरून निघाले. घरी त्यांनी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. वाल्मीकी मंदिरात पूजा करून त्यांचा रोड शो सुरू झाला. रोड शो मध्ये आपच्या कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. ‘अच्छे बिते पाच साल, लगे रहो केजरीवाल’ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपच्या नेत्या आतिशी व इतर नेतेही रोड शोमध्ये सामील झाले होते. केजरीवाल यांचे कुटुंबीयसुद्धा या रोड शोमध्ये होते. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आपच्या टोप्या होत्या.आपच्या कार्यकर्त्यांची गर्दी बरीच वाढल्याने मुख्यमंत्री केजरीवाल उमेदवारी अर्ज भरायला वेळेमध्ये पोहोचू शकले नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती; परंतु मुख्यमंत्री केजरीवाल जिल्हाधिकारी कार्यालयात उशिरा पोहोचल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना उद्या, (मंगळवार) अर्ज दाखल करावा लागणार आहे.कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने उशीर झाला. या कार्यकर्त्यांना सोडून उमेदवारी अर्ज दाखल करणे योग्य नव्हते. यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज भरता आला नाही.-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीElectionनिवडणूक