शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

केजरीवाल विचित्र, विचार न करता काहीही बोलतात, अमरिंदर सिंग यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 9:50 PM

दिल्लीतील प्रदूषणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. अमरिंदर सिंग यांनी आज केजरीवाल यांच्यावर खरमरीत टीका करताना केजरीवाल हे विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल हे असे व्यक्ती आहेत. ज्यांना कुठल्याही माहितीशिवाय काहीही बोलण्याची सवय आहे.दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र दोघांनीही केजरीवाल यांना भेटण्यास नकार दिला.केजरीवाल यांच्यावर टीका करताना अमरिंदर सिंग म्हणाले,"केजरीवाल विचित्र व्यक्ती आहेत. जे कुठल्याही मुद्द्यावर विचार न करता बोलायला सुरुवात करतात. आमच्याकडे सुमारे दोन अब्ज टन पिकांचा कडबा आहे.  आता मी काय शेतकऱ्यांना तो साठवून ठेवायला सांगू का? केजरीवाल यांना या समस्येची पुरेशी माहिती नाही आहे."असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला आहे. दिल्लीला धुरक्यापासून वाचवण्यासाठी केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतातील पाचट जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर तिन्ही राज्यांनी मिळून उपाय शोधला पाहिजे, असे सूचवले होते. त्याला उत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या कामात राज्याची नव्हे तर केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. तर खट्टर यांनी हरयाणा सरकार आपल्या पातळीवर योग्य ती कारवाई करत असल्याचे उत्तर दिले होते.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील पाचट जाळण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा आमदारच शेतातली पीक जाळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते सूरपाल खैरा हे शेतात पिक जाळताना दिसत आहेत.  दरम्यान, सुरपाल खैरा यांनी आपण येथील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी शेतातील पिक जाळत असल्याचे म्हटले आहे. खैरा यांनी 15 ऑक्टोबरला लुधियानामधील समराला येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांनी शेतातील पाचट जाळल्यामुळे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या विरोधात आपल्या शेतातील पीक जाळून निषेध नोंदवला होता. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालpollutionप्रदूषण