निसर्गोपचारासाठी केजरीवाल बेंगळुरूमध्ये
By Admin | Updated: March 5, 2015 23:53 IST2015-03-05T23:53:24+5:302015-03-05T23:53:24+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी मधुमेह आणि खोकल्यावरील निसर्गोपचारासाठी बेंगळुरूतील जिंदल नेचर केअर इन्स्टिट्यूटमध्ये भरती झाले़

निसर्गोपचारासाठी केजरीवाल बेंगळुरूमध्ये
बेंगळुरू : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी मधुमेह आणि खोकल्यावरील निसर्गोपचारासाठी बेंगळुरूतील जिंदल नेचर केअर इन्स्टिट्यूटमध्ये भरती झाले़
सकाळी ८ वाजताच्या सुमारास केजरीवाल आपल्या माता-पित्यासह बेंगळुरूकडे रवाना झाले़ दुपारी बेंगळुरू विमानतळावर पोहोचल्यावर ते थेट शहराबाहेर असलेल्या जिंदल नेचर केअर इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले़ केजरीवालांची शुअर वाढलेली आहे़ याशिवाय त्यांना खोकल्याची तीव्र समस्या आहे़ या दोन्ही आजारांवर पुढील १० दिवस त्यांच्यावर निसर्गोपचार केले जातील़ इन्स्टिट्यूटच्या डॉ़ बबीता नंदकुमार यांनी सांगितले की, केजरीवालांना डिटॉक्सीफिकेशन थेरपी दिली जाईल़ यापूर्वीही २०१२ मध्ये केजरीवाल यांनी या ठिकाणी उपचार घेतले आहेत़ (वृत्तसंस्था)