Arvind Kejriwal Rajya Sabha News: दिल्लीतून सत्ता गेल्यानंतर अरविंद केजरीवालपंजाबमधून राज्यसभेवर जाऊ शकतात, असे अंदाज मांडले जात होते. पण, केजरीवालांनी एका उद्योगपतींना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला. उद्योगपती राजिंदर गुप्ता यांच्या नावाची आम आदमी पक्षाने घोषणा केली आहे. २४ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे.
राजिंदर गुप्ता यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये बळकटी देणार असल्याचे म्हटले जात आहे. गुप्ता हे ६ ऑक्टोबर रोजी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
कोण आहेत राजिंदर गुप्ता?
राजिंदर गुप्ता हे गुप्ता ट्रायडेंट कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संजीव अरोरा यांच्यानंतर त्यांनी कंपनीची जबाबदारी स्वीकारली होती. राजिंदर गुप्ता हे पंजाबमधील प्रतिष्ठित उद्योगपती असून, हार्वड विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. ट्रायडेंट ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
राजिंदर गुप्ता हे पंजाब आर्थिक धोरणे आणि नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षही होते. राज्यसभेसाठी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशाच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवले जात असल्याचे आपने म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल हेच आपचे उमेदवार असतील, असे अंदाज मांडले जात होते. दिल्लीतील सत्ता गेल्यानंतर केजरीवाल संसदेत जाऊन पक्षाचा विस्तार करतील, असे म्हटले जात होते. पण, पक्षाने या चर्चा फेटाळल्या आणि पंजाबमधून राज्यसभेवर नवीन चेहरा पाठवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता राजिंदर गुप्तांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Web Summary : Arvind Kejriwal nominated industrialist Rajinder Gupta to the Rajya Sabha from Punjab. Gupta, founder of Trident Group, replaces Kejriwal as a potential candidate. The decision aims to strengthen AAP in Punjab. Gupta previously resigned from Punjab Economic Planning Board.
Web Summary : अरविंद केजरीवाल ने पंजाब से राज्यसभा के लिए उद्योगपति राजिंदर गुप्ता को मनोनीत किया। गुप्ता, ट्राइडेंट ग्रुप के संस्थापक, केजरीवाल के संभावित उम्मीदवार के रूप में जगह लेंगे। इस निर्णय का उद्देश्य पंजाब में आप को मजबूत करना है। गुप्ता ने पहले पंजाब आर्थिक योजना बोर्ड से इस्तीफा दे दिया था।