शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:26 IST

केदारनाथ धामच्या यात्रेसाठी दररोज लाखो लोक उत्तराखंडला येत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होणं सामान्य आहे.

केदारनाथ धामच्या यात्रेसाठी दररोज लाखो लोक उत्तराखंडला येत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होणं सामान्य आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रवाशांच्या आगमनामुळे हरिद्वारपासूनच वाहतूक कोंडी सुरू होते. केदारनाथला जाताना ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही प्रवाशांनी एक अनोखा मार्ग शोधला आणि प्रवासासाठी दोन रुग्णवाहिका बुक केल्या. हे लोक त्यांच्या योजनेत यशस्वीही होत होते. मात्र सोनप्रयागजवळ पोलिसांनी त्यांची हुशारी पकडली.

अनेकदा लोक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन मार्ग अवलंबतात. पण या लोकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच नव्हे तर शक्य तितक्या लवकर केदारनाथ धाम गाठण्यासाठीही शक्कल लढवली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवाशांनी दोन रुग्णवाहिका बुक केल्या आणि त्यात प्रवास करण्याचा प्लॅन केला. रुग्णवाहिकेत रुग्णाऐवजी प्रवासी केदारनाथ धामच्या यात्रेसाठी निघाले. १४ जून रोजी ही घटना घडली आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

असा उधळला डाव 

या प्रवाशांना माहित होतं की, रुग्णवाहिका कोणीही थांबवणार नाही. म्हणूनच ते सर्व रुग्णवाहिकेचा सायरन वाजवत हरिद्वारहून गौरीकुंडला रवाना झाले. पण सोनप्रयागजवळ पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळला. हरिद्वारपासून ऋषिकेश, व्यासी, देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, तिलवाडा, ऑगस्ट मुनी आणि गुप्तकाशी फाटा या ठिकाणी कडक पोलीस तपासणी सुरू आहे. 

पोलिसांना आला संशय

सोनप्रयाग पोलिसांना संशय आला की, गौरीकुंड किंवा केदारनाथ येथून त्यांना कोणताही प्रवासी जखमी किंवा आजारी असल्याची कोणतीही माहिती मिळाली नव्हती. कारण अनेकदा केदारनाथ किंवा गौरीकुंडमध्ये जेव्हा कोणी जखमी किंवा आजारी पडतो किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा सोनप्रयाग पोलिसांना तात्काळ कळवले जाते. अशा परिस्थितीत, पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही रुग्णवाहिका थांबवल्या. रुग्णवाहिकेचे दरवाजे उघडले तेव्हा पोलीस चकित झाले. कारण त्यात कोणीही जखमी किंवा आजारी व्यक्ती नव्हती. त्यात काही प्रवासी होते, जे वातानुकूलित रुग्णवाहिकेत आरामात बसले होते. ते कोणत्याही वाहतूक कोंडीत न अडकता गौरीकुंडकडे जात होते. 

टॅग्स :KedarnathकेदारनाथTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस