शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 50 वर्षं 'ते' लग्नाशिवाय एकत्र राहिले, मुलंही झाली; आणि आता....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:10 IST

73 वर्षीय नवरदेव आणि 67 वर्षीय नवरीचं थाटामाटात लग्न झालं आहे. विशेष म्हणजे हे दोघं तब्बल 50 वर्षं लग्नाशिवाय एकत्र राहिले होते.

ठळक मुद्देछत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यामध्ये एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.सुकाल निषाद आणि गौतरहिन बाई गेल्या 50 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. व्हॅलेंटाईन डे ला गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अनोखा विवाह सोहळा पार पडला. 

कवर्धा - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यामध्ये एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. 73 वर्षीय नवरदेव आणि 67 वर्षीय नवरीचं थाटामाटात लग्न झालं आहे. विशेष म्हणजे हे दोघं तब्बल 50 वर्षं लग्नाशिवाय एकत्र राहिले होते आणि त्यांना मुलंही झाली. त्यानंतर आता मुलांनी या दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अनोखा विवाह सोहळा पार पडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुकाल निषाद असं नवरदेवाचं तर गौतरहिन बाई अस नवरीचं नाव आहे. गेल्या 50 वर्षांपासून ते एकत्र राहत असून त्यांना तीन मुलं आहेत. सुकाल निषाद हे आपल्या एका नातेवाईकासाठी मुलगी बघायला बेमेतरा जिल्ह्यातील बिरसिंगी गावात आले होते. ज्या मुलीसोबत त्या नातेवाईकाचं लग्न होणार होतं तिची छोटी बहिण सुकाल निषाद यांना पसंत पडली. सुकाल यांनी गौतरहीन यांच्याबरोबर आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब होती. लग्नाचा खर्च करणं शक्य नव्हतं. त्यामुळे लग्न न करता ते दोघे नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहू लागले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. 

सुकाल निषाद आणि गौतरहिन बाई गेल्या 50 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. मात्र त्यांनी लग्न केलं नसल्याने मृत्यूनंतर या दोघांना मोक्ष प्राप्ती मिळणार नाही अशी चर्चा गावात सुरू होती. त्यामुळे आई-वडिलांसाठी मुलांनी अनोख्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. लग्नामुळे संपूर्ण कुटुंबीय आनंदात आहेत.अत्यंत धुमधडाक्यात गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. छत्तीसगडमध्ये सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

लष्करातल्या महिला अधिकाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नियुक्ती; मोदी सरकारला 'सर्वोच्च' धक्का

शिवसेना नाणारवरुन यू टर्न घेणार? मुख्यमंत्री कोकणात असूनही आंदोलकांची भेट नाकारणार

हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत

आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान

गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडmarriageलग्न