शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

२0 किलो सोन्याचे दागिने घालून गोल्डन बाबा निघाले कावड यात्रेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 06:17 IST

‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत.

नवी दिल्ली : ‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत. त्यांच्या अंगावरील सोन्याची किंमत बाजारभावानुसार अंदाजे ६ कोटी रुपये असेल. दर यात्रेला त्यांच्या अंगावर तोळा-मासाने नव्हे, तर किलोने सोने लगडलेले असते. मागच्या वर्षी त्यांनी साडेचौदा किलो सोन्याचे दागिने परिधान केले होते. २०१६ मध्येही त्यांच्या अंगावर १२ किलो सोने होते.यंदा त्यांच्या कावड यात्रेचे रौप्य वर्ष असल्याने ते अशा थाटामाटात कावड यात्रेत सहभागी झाले आहेत. बाबांचे मूळ नाव सुधीर मक्कर आहे.एक बीएमडब्ल्यू, ३ फॉर्च्युनर, २ आॅडीलवाजाम्यासह यात्रेत त्यांचा स्वतंत्र ताफा आणि जथा असतो. अंगभर सोने लेवून यात्रेला निघालेले गोल्डन बाबा २७ लाखांची रॉलेक्स घड्याळ वापरतात. ताफ्यात त्यांची बीएमडब्ल्यू, तीन फॉर्च्युनर, दोन आॅडी व दोन इनोव्हा कार आहेत. हरिद्वारला जाण्यासाठी ते हुमर, जग्वार आणि लँड रोव्हर, अशा आलिशान गाड्याही भाड्याने घेतात.सोन्याचा त्यांना भारी शौक आहे. १९७२-७३ मध्ये सोन्याचा भाव दोनशे रुपये तोळा होता, तेव्हा ते चार तोळे सोन्याचे दागिने घालीत असत. ही भोलेबाबाची कृपा आहे. इहलोकाचा निरोप घेईन तेव्ही हे सोने मी माझ्या पट्टशिष्याकडे सुपूर्द करील, असे गोल्डन बाबा सांगतात.आधी व्यवसाय, आता बाबाबाबा होण्यापूर्वी त्यांचा दिल्लीत गांधीनगर मार्केटमध्ये कापड व स्थावर मालमत्तेचा व्यवसाय होता. गाझियाबादमध्ये त्यांचा एक आलिशान फ्लॅट आहे. यात्रेत गोल्डन बाबाला पाहण्यासाठी मुले, महिला मोठ्या उत्सुकतनेने वाट पाहत असतात. अनेक जण त्यांच्यासोबत व्हिडिओ चित्रण करतात. सेल्फी घेतात.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीBmwबीएमडब्ल्यूGoldसोनं