शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:29 IST

Honeymoon couple goes missing sikkim : हनिमूनसाठी कौशलेंद्र आणि अंकिता सिक्कीमला गेले होते. पण, पहिल्याच दिवशी त्यांच्यासोबत दुर्घटना घडली. दोन आठवडे उलटले तरीही त्यांच्याबद्दल काही कळू शकलेलं नाही. 

Honeymoon couple goes missing News: राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील एक जोडपे सिक्कीमला गेल्यानंतर बेपत्ता झाले आहे. कौशलेंद्र प्रताप सिंह आणि अंकिता सिंह हे हनिमूनसाठी सिक्कीमला गेले. २४ मे रोजी ते सिक्कीमसाठी रवाना झाले होते. त्यानंतर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि तेव्हापासून त्यांच्याबद्दल काही कळू शकलेले नाही. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कौशलेंद्र आणि अंकिता २४ मे रोजी सिक्कीममध्ये गेल्यानंतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. मंगन जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या भागातच ही घटना घडली. कौशलेंद्र आणि अंकिता बसलेली गाडी १००० फूट खोल तीस्ता नदीत कोसळली. 

वाचा >>"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?

कौशलेंद्र आणि अंकिता ज्या कारने जात होते, लाचेन-लाचुंग महामार्गावरील मुन्सिथांगजवळ कार अपघातग्रस्त होऊन खाली कोसळली. त्यांच्या गाडीत काही लोक होते, त्यापैकी एका मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहे. तर आठ प्रवासी बेपत्ता आहेत. 

मुलगा आणि सुनेच्या शोधासाठी कौशलेंद्रचे वडील सिक्कीममध्ये  

शेर बहादूर सिंह हे मुलगा कौशलेंद्र आणि सून अंकिता यांच्या शोधासाठी आठवडाभरापासून सिक्कीममध्ये आहेत. 

त्यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, त्या म्हटले आहे की, "सिक्कीममध्ये एका नदी वाहन कोसळून माझा मुलगा आणि सून बेपत्ता झाले आहेत. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, त्यांनी सिक्कीमच्या अधिकाऱ्यांना शोध मोहिमेला वेग देण्यास सांगावे."

माझ्या मुलाची आणि सुनेची एकही वस्तू सापडली नाही

शेर बहादूर सिंह यांनी सांगितले की, "आठवा दिवस आहे. आम्ही कित्येक वेळा घटनास्थळी गेलो. घटनास्थळी ज्या वस्तू सापडल्या आहेत, त्यात माझ्या मुलाची किंवा सुनेची एकही वस्तू नाही. जोपर्यंत ते सापडत नाही, तोपर्यंत मी घरी जाणार नाही. माझा मुलगा आणि सून सुखरुप असावी, यासाठी प्रार्थंना करा."

अपघातात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू असला, तरी त्यांच्याबद्दल कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. नदी आणि किनाऱ्यावर शोध घेतला जात आहे. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कौशलेंद्र आणि अंकिता ज्या गाडीतून प्रवास करत होते, त्यात ११ लोक होते. त्यापैकी दोघे ओडिशाचे होते. सुप्रतिम नायक आणि साईराज जेना अशी त्यांची नावे आहेत. अपघात घडला, तेव्हाच दोघांना वाचवण्यात यश ले. 

बेपत्ता असलेल्या आठ पर्यटकांपैकी चार ओडिशाचे आहेत, तर उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा प्रत्येकी दोन पर्यटक आहेत. गाडीच्या चालकाचीही ओळख पटली असून, पासांग डेनू शेरपा असे त्याचे नाव आहे. 

टॅग्स :Accidentअपघातhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस