शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Corona Vaccine : कोरोना लसीमुळे नपुंसकता?; लोकांची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराचं अजब विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 16:10 IST

BJP Sanjay Pathak And Corona Vaccine : भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही अनेकांच्या मनात लसीबद्दल भीती असल्याने ते लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. याच दरम्यान लोकांची लसीकरणाबाबतची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराने एक अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

कोरोना लसीवर (Corona Vaccine) पसरलेल्या अफवांच्या दरम्यानच मध्य प्रदेशातील कटनीच्या विजयराघवगडचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात ते म्हणाले, 'अनेक मूर्ख लोक अफवा पसरवत आहेत की कोरोना लस नपुंसकत्व आणेल, पण असे काहीही घडत नाही. मी देखील लस घेतल्यानंतर टेन्शनमध्ये होतो आणि त्यानंतर 3-4 महिन्यांनी स्वत: ची तपासणी केली असता काहीच झालेलं नसल्याचं दिसून आलं आहे. 

माजी मंत्री संजय पाठक यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्ही टेन्शन होऊ नका आणि कोणत्याही गोष्टी मनावर घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीत, लसीकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येकजण सुरक्षित असेल असं देखील म्हटलं आहे. पाठक यांच्या या विधानाचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 154 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 25,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 25,166 नवे रुग्ण, 5 महिन्यांतील नीचांक

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (17 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,69,846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 97.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतBJPभाजपा