कडेठाणला हरिनाम सप्ताहाची आज सांगता
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
वरवंड: कडेठाण (ता. दौंड) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उद्या (बुधवार) होत असल्याची माहिती सरपंच लक्ष्मण दिवेकर यांनी दिली.

कडेठाणला हरिनाम सप्ताहाची आज सांगता
व वंड: कडेठाण (ता. दौंड) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उद्या (बुधवार) होत असल्याची माहिती सरपंच लक्ष्मण दिवेकर यांनी दिली. कडेठाण येथील महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री शिवलीलामृत ग्रंथपारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. जगन्नाथ येराडकर, रमेश भोसले, वैष्णवी पवार, हरीश फडके, संजय वाबळे, श्रावण साळुंखे यांची कीर्तने झाली. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे पहिलेच वर्ष असून, गावातील महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिराच्या जीर्णोद्धाराची संकल्पना सरपंच लक्ष्मण दिवेकर यांनी मांडली, त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. -----------------