शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमधील काझीगुंड येथे चकमक, एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 21:13 IST

जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. लष्कराने या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. लष्कराने या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, ही चकमक अद्याप सुरू आहे. काश्मीरमधील काझीगुंड येथे आज संध्याकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. तर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवानाला वीरमरण आले. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 7 वर्षांच्या इतिहासात 2017मध्ये पहिल्यांदाच दहशतवाद विरोधी मोहिमेत 200 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या या संयुक्त कारवाईत यंदाच्या वर्षांत 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून  चार दिवसांपूर्वी दिली होती.  लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवाद्यांसोबतच्या सर्वाधिक चकमकी या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियाँन आणि अनंतनाग जिल्ह्यात झाल्या आहेत. तर उर्वरित चकमकी या उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात  आणि मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी