शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Jammu And Kashmir : बांदीपोरा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 10:23 IST

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी चकमक सुरू आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी चकमक सुरू आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (11 नोव्हेंबर) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बांदीपोरामध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये काही दिवसांपूर्वी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. या स्फोटात पाच जण जखमी झाले होते. जखमींमध्ये चार पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश होता. मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी 9.30 च्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आयईडी स्फोट झाला. इंफाळच्या थंगल बाजारातील शनि मंदिराजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंफाळमधील हा परिसर हाय सिक्युरिटी असणारा समजला जातो. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. याआधी काही दिवसांपूर्वी तेलीपाटी परिसरात एक स्फोट झाला होता. त्यामध्ये बीएसएफचे तीन जवान जखमी झाले होते.

जम्मू - काश्मीरमध्ये सोमवारी (4 नोव्हेंबर) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी भरगर्दी असलेल्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये देखील याआधी दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथील हॉटेल प्लाझाजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 20 नागरिक जखमी झाले. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच याआधी श्रीनगरमधील करणनगर परिसरात सीआरपीएफ आणि पोलीस यांच्या संयुक्त पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळीही दहशतवाद्यांनी  जवानांवर ग्रेनेड फेकले होते. हा हल्ला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास करण्यात आला होता.  यात सहा सीआरपीएफचे जवान जखमी झाले होते. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद