शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

केंद्र सरकारचा प्रवाशांना मोठा दिलासा; 'या' राज्यात रेल्वेने निम्म्यावर आणले तिकीट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 7:06 PM

Kashmir Vally Trains Fare: 1 एप्रिलपासून रेल्वे तिकीट, केटरिंग, दंड वसुली आणि पार्किंगसह स्थानकांवर सर्व ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची सुविधा सुरू होणार आहे.

Indian Railways New Rules: गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बदल होत आहेत. अनेक दशकांपासून दहशतवादाने ग्रासलेल्या राज्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता रेल्वे विभागाने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. उत्तर रेल्वेने बुधवारी (20 मार्च) काश्मीर खोऱ्यातील रेल्वे भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाने राज्यातील रेल्वे भाडे 40 ते 50 टक्क्यांनी कमी केले आहेत. सवलतीपूर्वी, सदुरा स्टेशन (अनंतनाग जिल्हा) ते श्रीनगरचे भाडे 35 रुपये होते, ते आता 15 रुपयांपर्यंत खाली आले आहे. हा तिकीट दरातील दिलासा संपूर्ण काश्मीर खोऱ्यात लागू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, खोऱ्याच्या उत्तरेकडील बारामुल्ला शहरापासून, ते जम्मू विभागातील रामबन जिल्ह्यातील सांगलदानपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस उधमपूर ते बारामुल्ला अशी रेल्वे सेवा सुरू होईल, जी खोऱ्याला रेल्वे सेवेद्वारे देशाच्या इतर भागाशी जोडेल.

डिजिटल इंडिया व्हिजनला चालना भारतीय रेल्वेने आता डिजिटल इंडिया व्हिजनला चालना देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात रेल्वेने पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया स्वीकारण्याची घोषणा केली आहे. कॅशलेस पेमेंटवर भर देण्यासाठी रेल्वे आपले सर्व तिकीट काउंटर QR कोडने सुसज्ज करणार आहे. यानंतर सर्व रेल्वे स्थानकांवर सर्वसाधारण आणि आरक्षित तिकिटांसाठी QR कोड वापरुन तिकिटे खरेदी करता येतील. यामुळे तिकीट काढण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्याचा त्रासही दूर होणार आहे.

हे लागू झाल्यानंतर 1 एप्रिलपासून रेल्वे तिकीट, केटरिंग, दंड वसुली आणि पार्किंगसह सर्व ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची सुविधा सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे रेल्वे आता क्यूआर कोड स्कॅनद्वारे ट्रेनमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल करणार आहे. ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यासाठी नुकतेच रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे विभागांना मार्चअखेर तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार