शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

Kashmir Target Killing: दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी, अमित शहांची अजित डोभाल आणि RAW प्रमुखांसोबत दुसरी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:24 IST

Kashmir Target Killing: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Kashmir Target Killing: काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित, गैर-काश्मिरी हिंदू आणि देशभक्त मुस्लिमांची निर्घृणपणे हत्या केल्या जात आहेत. 3 दिवसात 3 हिंदू मारले गेले, तर यावर्षी आतापर्यंत 18 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक या घटनांनी 90च्या दशकातील आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. या घटनांमुळे खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा सलग दुसऱ्या दिवशी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. 

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काश्मिरी पंडित जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली आहे. याशिवाय, 2019 मध्ये कलम 370 अंतर्गत राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य झाल्यामुळे आणि पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरोधात स्थानिकांचा आवाज वर गेल्यामुळे दहशतवादी संतापले आहेत. यामुळेच ते टार्गेट किलिंग करत आहेत. तीन दिवसांत एक काश्मिरी आणि दोन बिगर-काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी कुलगाममधील शाळेबाहेर दहशतवाद्यांनी रजनी बाला नावाच्या सरकारी शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली. गुरुवारी कुलगामच्या अरेह गावात दहशतवाद्यांनी स्थानिक देहाती बँकेचे बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते राजस्थानचे रहिवासी होते. कुमार यांच्या हत्येनंतर काही तासांनी दहशतवाद्यांनी बडगाममध्ये गैर-काश्मीरी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दिलखुश कुमार यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी तहसील परिसरात घुसून लिपिक राहुल भट यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

टार्गेट किलिंगच्या विरोधात योजना तयार कराविजय कुमार यांच्या हत्येनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीत NSA अजित डोवाल आणि RAW प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत बैठक घेतली. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आणि जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी एलजी मनोज सिन्हा यांच्यासोबत शाह यांची बैठक प्रस्तावित होती, परंतु त्याच्या एक दिवस आधी त्यांनी दहशतवादविरोधी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी NSA सोबत बैठक घेतली. टार्गेट किलिंगमध्ये गुंतलेले बहुतेक दहशतवादी असे आहेत ज्यांचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही किंवा त्यांनी कोणत्याही दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतलेले नाही. हे 'हायब्रीड' दहशतवादी सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान बनले आहेत. याला सामोरे जाण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस अशा 'अदृश्य' हायब्रीड दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करतील, अशी रणनीती आखण्यात आली आहे. 

दहशदवाद्यांचा नवीन पॅटर्न जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवाद्यांनी डावपेच बदलले आहेत. दहशतवादी आता क्षुल्लक गुन्हे किंवा कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या स्थानिक तरुणांना आमिष दाखवून त्यांची भरती करत आहेत. कुख्यात दहशतवादी स्थानिक तरुणांना पैसे किंवा ड्रग्सचे आमिष दाखवत आहेत. त्यांना पिस्तुलांचा पुरवठा केला जात असून हे तरुण 'अर्धवेळ दहशतवादी' किंवा 'हायब्रीड दहशतवादी' म्हणून काम करत आहेत. या दहशतवाद्यांसाठी सामान्य नागरिक हे सोपे शिकार आहेत. हल्ला केल्यानंतर ते पळून जातात आणि हल्ल्यानंतर ते सुरक्षा दलांच्या रडारवरही येत नाहीत. गुरुवारी बँक मॅनेजरच्या हत्येतही अशाच एका हायब्रीड दहशतवाद्याचा हात होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीAmit Shahअमित शाहAjit Dovalअजित डोवाल